भडगाव, दिनांक 25 ( प्रतिनिधी ) भडगाव पेठ भागात आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहात आज वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
भडगाव पेठ भागातील अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहात भागवत कथा निरुपणासह नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत. यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्मित झाले आहे. या सप्ताहाला आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तर ताईंनी भागवत कथा श्रवणाचा आनंद घेतला.
याप्रसंगी वैशालीताई सूर्यवंशी यांच्यासोबत मनोहरदादा चौधरी योजनाताई पाटील, डी. डी. पाटील सर यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.