पाचोरा दिनांक 26 ( प्रतिनिधी ) जन्माष्टमी निमित्त संघवी परिवाराच्या वतीने आज भाविकांना वैशालीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते साबुदाण्याचे वाटप करण्यात आले.
आज जन्माष्टमी तसेच श्रावण सोमवार असा दुहेरी योग जोडून आलेला आहे. यामुळे आज बहुतेक जणांनी उपवास धरलेला आहे. याचे औचित्य साधून अशोक संघवी, राहुल संघवी आणि आनंद संघवी यांच्या वतीने भाविकांना साबुदाण्याचे वाटप करण्यात येत आहे. शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या हस्ते मानसिंगका मार्केटच्या परिसरात भाविकांना आज सकाळपासून साबुदाण्याचे वाटप करण्यात येत आहे. असंख्य भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला.
याप्रसंगी वैशालीताई सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.