पाचोरा, दिनांक २६ (प्रतिनिधी ) : तालुक्यातील गाळण बुद्रुक व खुर्द, हनुमानवाडी व विष्णूनगर येथील पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. वैशालीताई सुर्यवंशी यांनी त्यांचे स्वागत केले.
कृषी कन्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या पाठीशी मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात जनता उभी राहत असल्याचे चित्र असून आज पुन्हा नव्याने पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यात गाळण खुर्द व बुद्रुक, हनुमानवाडी व विष्णूनगरातील पदाधिकाऱ्यांनी वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना-उबाठात प्रवेश घेतला. याप्रसंगी गाळण येथील ओम बोरसे या पदाधिकाऱ्याचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला
या प्रवेश सोहळ्याला वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह शरद पाटील, अभय पाटील, दादाभाऊ चौधरी, गजू पाटील, संदीप जैन, हरीश देवरे, मनोज चौधरी, लक्ष्मण ठाणसिंग राठोड, डॉ. भूषण पाटील, शशी बोरसे, चंदू पाटील, पितांबर चरणदास राठोड, नाना भिला पाटील, रामदास गुलाब राठोड, महेश माणिक पाटील, मांगो नारायण राठोड, हिलाल भगवान पाटील, शंकर तुपे, गोविंदसिंग राजपूत, शंकर भिका राठोड, भावलाल राठोड, हिरा पाटील, देवचंद राठोड यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.