पाचोरा, दिनांक 6 (प्रतिनिधी ) : शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी आज माहेजी ते शिर्डी या पायी दिंडी व पालखी सोहळ्यात सहभागी होऊन वंदन केले.
माहेजी येथील साई एकता मित्रमंडळाच्या वतीने श्रीसाई मंदिरातून दरवर्षी माहेजी ते शिर्डी अशा पायी दिंडीच्या माध्यमातून पालखी सोहळा निघत असतो. यात गावासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. आज येथील पायी दिंडी शिर्डी येथे रवाना झाली. या अनुषंगाने आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी माहेजी येथील श्रीसाई मंदिरात दर्शन घेतले.
या मंदिरात वैशालीताईंच्या हस्ते श्री साईंची आरती करण्यात आली. यानंतर त्यांच्याच उपस्थितीत पायी दिंडी व पालखी सोहळ्याचा शुभारंभ झाला.स्वत: वैशालीताईंनी पालखी सोहळ्यात सहभागी होऊन साई आराधना केली. याप्रसंगी त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद देखील साधला. त्यांच्या समवेत विनोद बाविस्कर, विनोद पाटील, मिथुन वाघ, दत्तू आहिरे, गुलाब पाटील, सोनू पाटील शिवसेना-युवासेना शाखा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.