पाचोरा, दिनांक २६ (प्रतिनिधी ) : शहरातील इस्कॉन संस्थेच्या श्री कृष्ण मंदिरात आज वैशालीताई आणि नरेंद्रसिंगदादा सुर्यवंशी यांनी भेट देऊन पूजन केले.
आज सर्वत्र जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त ठिकठिकाणच्या श्रीकृष्ण मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होत्ो. यात इस्कॉनच्या देवस्थानातही आज विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आज वैशालीताई आणि नरेंद्रसिंगदादा सुर्यवंशी यांनी भेट दिली. त्यांनी श्रीकृष्ण भगवान यांचे पूजन करून आशीर्वाद घेतले.