भडगाव, दिनांक २६ (प्रतिनिधी ) : तालुक्यातील वाडे येथील रहिवासी रोहित धनराज परदेशी याची नुकतीच एसआरपीएफमध्ये निवड झाल्यानिमित्त आज वैशालीताई नरेंद्रसिंग परदेशी यांनी त्याचा सत्कार केला.
अनेक अडचणींवर मात करून रोहित धनराज परदेशी याने राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच एसआरपीएफमध्ये नोकरी मिळवण्याची मोठी कामगिरी केली असून तो प्रशिक्षणाला रवाना होत आहे. आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी त्याचा हृद्य सत्कार करून आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या सोबत दीपक पाटील, गोरखदादा, नवल राजपूत, भूषण देवरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.