पाचोऱ्यात महाविकास आघाडीचे ‘जोडे मारो’ आंदोलन

पाचोरा, दिनांक 2 (प्रतिनिधी ) : मालवण येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळा प्रकरणी राज्यातील सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आज येथे महाविकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून निघाला.

मालवण येथील राजकोट या किल्याच्या परिसरात पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पंतप्रधान, मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितल्याची मखलाशी केली असली तरी फडणवीसांनी माफी मागितलेली नाही. तसेच भाजपचे नेते संभ्रमावस्था निर्माण करणारी वक्तव्ये करत असल्याने महाविकास आघाडीने राज्यभरात आक्रमक पवित्रा घेत जोडेमार आंदोलन सुरू केले आहे. या अनुषंगाने आज पाचोरा येथे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तसेच मित्रपक्षांनी आज पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रतिमांना जोडे मारून त्यांचा निषेध करण्यात आला. यानंतर नायब तहसीलदार कुमावत यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, विधानसभा प्रमुख नितीन तावडे, शहर अध्यक्ष अजहर खान, ‘शिवसेना उबाठा’चे उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, माजी उपजिल्हा प्रमुख अॅड. अभय पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, माजी शहरप्रमुख भरत खंडेलवाल, शहर प्रमुख अनिल सावंत, अरुण तांबे, ज्ञानेश्वर चौधरी, युवा सेना उपजिल्हाप्रमुख संदीप जैन, पप्पू राजपूत, उपशहर प्रमुख अभिषेक खंडेलवाल, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील, कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील, इरफान मन्यार, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष इस्माईल तांबोळी, युवा सेना तालुका प्रमुख शशी पाटील, अरुण तांबे, युवा सेना शहरप्रमुख मनोज चौधरी, उपशहर प्रमुख गजानन सावंत, उपशहर प्रमुख पप्पू जाधव, खंडू सोनवणे, बंडू मोरे, ज्ञानेश्वर चौधरी, नामदेव चौधरी, गजू पाटील, प्रशांत पाटील, हरिभाऊ पाटील, राकेश सोनवणे, बबलू भोई, संतोष पाटील, श्री. गांगुर्डे, धर्मराज पाटील, राजू गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top