सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी या निर्मल समूह व निर्मल स्कूलच्या व्यवस्थापनात कार्यमग्न असतांनाच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. मराठी जनांच्या हितासाठी सातत्याने लढणाऱ्या शिवसेनेला गद्दारीने धक्का दिला. पक्षात उभी फूट पडल्यानंतर पाचोरा-भडगावच्या आमदारांनी एकनिष्ठपणे मूळ शिवसेनेसोबत राहण्याऐवजी गद्दारीचा मार्ग निवडला. यामुळे मतदारसंघातील सर्व निष्ठावंतांनी वैशालीताई यांना सक्रीय होण्याची गळ घातली. तर जनमानसातून देखील हाच सुर उमटू लागल्याने त्यांनी मातोश्रीवर जाऊन हाती शिवबंधन बांधत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निष्ठेचा झेंडा हाती घेतला आहे. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या कर्तृत्वाचा वसा आणि वारसा अतिशय समर्थपणे पुढे नेणाऱ्या वैशालीताई सुर्यवंशी या निष्ठेच्या बाजूने रणांगणात उतरल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून त्या मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या सुख-दु:खात सातत्याने सहभागी होत असून जनतेच्या सेवेत अहोरात्र मग्न आहेत. याचेच फलीत म्हणून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा गेल्या निवडणुकीतील भरभक्कम लीड तोडून त्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला चांगली मते मिळवून दिली. विरोधी बाजूला तीन मातब्बर उमेदवार असतांना त्यांनी एकटीने खिंड लढवत मिळवलेली मते पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहे. यामुळे आता त्यांनी अफवा सुरू केल्या आहेत. तथापि, वैशालीताई सुर्यवंशी या जनतेच्या हितासाठी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तिकिटावर महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार हे अगदी निश्चीत आहे. आपण सर्वांनी या लढ्यात ताईंच्या सोबत यावे ही आग्रहाची आणि कळकळीची विनंती !
Scroll to Top