पाचोरा-भडगाव तालुक्याच्या विकासात माजी आमदार तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या आमदारकीचा दहा वर्षांचा कार्यकाळ हा विकासाच्या दृष्टीने सुवर्णकाळ होता. या कालावधीत विविध योजनांना गती मिळून याचा सर्वसामान्यांना लाभ झाला. हाच वारसा घेऊन वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी या जनतेच्या दरबारात कौल मागत आहेत. पाचोरा व भडगाव मतदारसंघातील विकासाचे एक व्यापक ‘व्हिजन’ घेऊन त्या जनतेसमोर येत आहेत. यात मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासह येथील जनतेच्या प्रगतीसाठी एक अतिशय व्यापक असा आराखडा आखण्यात आलेला आहे. या माध्यमातून मतदारसंघात विकासाचे एक नवीन पर्व सुरू करण्याचा संकल्प वैशालीताईंनी घेतला आहे.
या संदर्भात वैशालीताई सुर्यवंशी यांचे संकल्पपत्र अर्थात ‘व्हिजन डॉक्युमेंट’ हे लवकरच आपल्या समोर मांडण्यात येणार आहे. आम्ही ताईंच्या संकेतस्थळावर देखील ते उपलब्ध करणार आहोत.