वाटचाल

सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग परदेशी या पाचोरा येथील निर्मल सीडस ही प्रगतीशील कंपनी तसेच निर्मल इंटरनॅशनल या तालुक्यातील पहिल्या व सर्वात मोठ्या सीबीएसई स्कूलच्या संचालिका आहेत.अत्यंत सर्वसाधारण स्थितीतून निर्मल सारखा मोठा बहुराष्ट्रीय ब्रँड उभारणारे पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या त्या कन्या ! वडलांप्रमाणेच त्यांनी कृषीतील एम.एस्सी. ही पदवी संपादन केली असून विविध क्षेत्रांमध्ये आपल्या गुणवत्तेची मोहोर उमटवली आहे.

तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांचा वसा व वारसा अतिशय तडफेने पुढे घेऊन जाणाऱ्या वैशालीताई सुर्यवंशी या फक्त कार्यकुशल बिझनेस वुमनच नसून याच्या जोडीला त्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात देखील कार्यरत आहेत. तात्यासाहेबांनी दिलेल्या मार्गावरून आगेकूच करत असतांना त्यांच्या राजकीय पाठबळाने आमदारकी उपभोगणाऱ्याने गद्दारीच्या माध्यमातून बट्टा लावण्याचे काम जेव्हा केले तेव्हा ताईंनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. तात्यासाहेब शेवटपर्यंत ज्या विचारांशी व नेतृत्वाशी एकनिष्ठपणा राखून होते. त्याच मातोश्रीवर जाऊन वैशालीताई सुर्यवंशी यांनी हातात भगवा घेत रणशिंग फुंकले आहे.

आज पाचोरा-भडगाव तालुक्यात सुरू असलेला राजकीय अनाचार व खुनशी राजकारण मोडीत काढण्यासाठी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी परिवर्तनाचा नारा बुलंद केला आहे. त्यांच्या या लढ्याला मतदारसंघातून भरभरून प्रतिसाद लाभत आहे. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या प्रमाणेच मतदारसंघाचा भरीव सर्वांगीण विकास करतांनाच सर्व जनतेला आपले कुटुंब समजून त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होण्याचा त्यांचा तेजस्वी वारसा अतिशय समर्थपणे त्या पुढे घेऊन जात आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी या शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल या चिन्हावरून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून पाचोरा-भडगाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मतदारसंघातील जनता त्यांना नक्कीच कौल देणार असा आम्हाला विश्वास आहे.

 

Scroll to Top