उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसाला शेकडो तरूण ‘शिवसेना-उबाठा’त दाखल

पाचोरा, दिनांक २७ (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाला तालुक्यातील तीन गावांमधील शेकडो युवकांनी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला असून आज हा सोहळा पार पडला.

आज माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून पाचोरा-भडगाव मतदारसंघात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तर आजच लोण पिराचे, वडगाव स्वामीचे आणि नाचणखेडा येथील शेकडो तरूणांनी वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून पक्षात प्रवेश घेतला.

याप्रसंगी प्रवेशाच्या सोहळ्यात वैशालीताई सुर्यवंशी यांनी पक्षात प्रवेश घेणार्‍या तरूणांना भगवा पटका देऊन त्यांचे स्वागत केले. तर मतदारसंघातील सद्यस्थिती बदलण्यासाठीच्या लढ्यात तरूणाईने महत्वाची भूमिका पार पाडण्याचे आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केले.
या प्रवेश सोहळ्याला अरूण पाटील, शरद पाटील, संतोष पाटील, निखील भुसारे, उपजिल्हाप्रमुख दीपक आधार पाटील, योजनाताई पाटील, चेतन पाटील, किशोर पांडुरंग देसले, अनिता देसले, डी. डी. पाटील सर, बालूअण्णा, सुभाष नामदेव पाटील, नारायण त्रयंबक पाटील, गुलाब प्रताप पाटील, रमेश रतन पाटील, अविनाश प्रकाश निकुंभ, गुलाब अंबरसिंग पाटील, संदीप प्रल्हाद पाटील, पंडित रतन मोरे, विजयसिंग झावडू पाटील, अमोल रामदास पाटील व चेतन करणसिंग पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top