पाचोरा, दिनांक ३१ (प्रतिनिधी) : शिंदे गटाचे शिलेदार गजू पाटील यांनी आज वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
आज सकाळी पाचोर्यात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यात शिंदे गटाचे पदाधिकारी गजू पाटील यांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करतांना निष्ठेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे. त्यांचे स्वागत करतांना वैशालीताई सुर्यवंशी म्हणाल्या की, आता सर्वांना ओरीजनल निष्ठावंत शिवसेनेची महत्ता कळत असून बरेच पदाधिकारी आपल्या मूळ पक्षात परतत आहेत. आता गजू पाटील यांच्यामुळे पक्षाला स्थानिक पातळीवर बळकटी येणार असून येत्या काही दिवसांमध्ये अजून काही मान्यवर आमच्या सोबत येणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
या प्रवेश सोहळ्याला वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या सोबत उध्दव मराठे, अरूण पाटील, शरद पाटील, बालूतात्या, अभय पाटील, अविनाश पाटील, संदीप जैन, हरिश देवरे, मनोज चौधरी, कुंदन पांड्या आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.